Sunday, February 14, 2010

आठवड्याची मराठी सांगता !!!

आठवड्याची मराठी सांगता !!!

तो दिवस होता २३ जाने, २०१०. एक शनिवार ........ घाबरू नका काही Serious सांगत नाहीये. अहो नेहमी येतोना तसाच शनिवार. दर आठवड्याला येतोना अगदी तसाच ...... नेहमीसारखाच सुरु झाला....  सकाळी आरामात उठलो. सर्वांच  तसचं  असत. सुट्टी असते ना... मग काय....सर्वचं " आ रा मा त "....

संध्याकाळी  निलेश आणि संदीप दादा ( निलेशचा मोठा भाऊ )  बरोबर फिरायला गेलो ..... म्हटल जरा मजा करू ...जरा .. नेत्र सुख घेऊ .....   METRO JUNCTION  ला गेलो .... आता तुम्ही म्हणाल हे कोणत नविन स्टेशन ( Junction म्हणून म्हटलं ) ... अहो हे काही स्टेशन नाही हे  आमच्या कडच्या MALL चे नाव आहे  .....तिथे असलेल्या फेम मध्ये दूसऱ्या दिवसाची बुक केलेली झेंडा पिक्चर ची टिकिट कलेक्ट करुया ...... तर काय स्क्रीन वर आणखी एक पिक्चर लागला होता ... " नटरंग ".....



एक मन म्हणत होत "आता जाऊया की घरी वाजले की नऊ ".... पिक्चर पण नऊचाच.... वा..... चला अंगाताले कीड़े वळवळ करू लागले... पटापट फोनाफोनी झाली ... घरी सांगीतले जेवायला येत नाही.... पिक्चरला चाललो आहे ..... पलीकडून थोडा आवाज वाढला ... " काय हे शनिवार - रविवार नेहामिचच काय चाललय ? ... कधीतरी वीकएंड ला घरी रहा .... पायाला भींगऱ्या लावल्यात का ? .... भटकत असतो " ......... पण ठीक आहे ..... काढली टिकिट आणि बघितला नटरंग ...... काय पिक्चर आहे राव .... एकदम झक्कास .....पिक्चर म्हणजे फक्त अतुल कुलकर्णी ..... सुरेख   ....पिक्चर तर बघून झाला पण मुख्य काम ज्यासाठी काउंटर वर गेलो होतो ते तर रहिलचं  - झेंडा पिक्चर ची टिकिट घेण..... खुप भूख लागली होती म्हणून काय खाव तर स्टेशन वर जाऊन गाडीवर भुर्जी पाव वर मनसोक्त ताव मारला .. .... घरी उशिरा आलो होतो पिक्चर बघून म्हणून काही बोलले नाहित... वाचलो बुवा .....


दुसऱ्या दिवशी ( रविवार २४ जाने, २०१० )  सकाळी लवकर अंजुरच्या गणपतीला गेलो ... जास्त नाही १५ ते २० किमी असेल कल्याण पासून ...... मी आणि निलेश बाईकवरच गेलो ....
दुपारचा पिक्चर होत ३ वाजता ........ घरचे सगळे गेलो पिक्चरला .... आमच्या बरोबर निलेश , त्याची आई आणि  संदीप दादा पण होता .... पिक्चर बघितला " झेंडा " ...


 पण मजा नाही आली ... जे न्यूज़ चैनल वर बघितलं ... तेच पैसे देऊन पुन्हा बघितलं ...  काही नवीन नव्हतं पिक्चर मधे .... पिक्चर बघितला घरच्यांना Mall दाखवला आणि परत निघालो..... तर ... टिकिट काउंटर वरील  आणखी एका पिक्चर च्या पोस्टर कड़े लक्ष गेलं .... झालं  ... पुन्हा कीड़े वळवळले .... निलेश , दादा आणि  माझ्यात थोड़ी खुसफुस झाली .... आईला अंदाज़ आला .... ती म्हणाली " आता बस झालं ,  २ पिक्चर बघितले ना ? ". आम्ही काही बोललो नाही. घरच्यांना ऑटो मधे बसवले आणि जरा फिरून येऊ घरी म्हणून सांगीतले ... ६ च वाजले होते ना ..... पुन्हा Mall मधे गेलो आणि ..... ........   आता तुम्हाला कळलेच असेल .... पुन्हा पिक्चर ची टिकिट काढली .... ७.१० चा  पिक्चर होता .... "शिक्षणाच्या _______  ___ ". मयुरेशला फ़ोन केला तो पण तयार झाला ..... त्याला पिक-अप करायला त्याच्या घरी गेलो ... येताना मस्त एक कटिंग मारला ....... आणि परत Mall ला ...... पिक्चर छान आहे ..... भरत जाधव चे काम सुन्दर .....



घरी सांगितल की पुन्हा पिक्चर बघितला.... पण तो दादाने Sponsor केला होता सांगितल्यावर ओरडयाची तीव्रता थोड़ी कमी झाली ..... पण  height  बघाना सर्व पिक्चर ५ पैकी स्क्रीन नंबर १ वरच होते .... जसे काही आम्ही त्या स्क्रीन चे रहिवासी झालो होतो ......   जाऊ दे ....

एकंदरीत मजा आली ..... Something Different ..... अशी झाली आठवडयाची मराठी सांगता .......