Saturday, March 30, 2013

भूक लागली … खूप पर्याय आहेत

भूक लागली … खूप पर्याय आहेत

त्या दिवशी Maharashtra Times मधला लेख वाचला "कल्याणची खाऊगल्ली". त्यात खिडकी वडा, निलेश पाणीपुरी, पारनाक्यावरची पावभाजी अश्या बऱ्याच ठिकाणांची माहिती आहे. त्यात आणखी गोष्टींची भर घालावी म्हणून हा लेख -

कल्याण स्टेशन वरून शिवाजी चौकाकडे जाताना मध्ये हॉटेल लागत  "इच्छादेवी ". होटल लहानच आहे. पण प्रसिध्द आहे ते कांदाभजी साठी.

अहिल्याबाई चौकात पाणीपुरीच्या २ गाड्या लागतात. त्यावर संध्याकाळी खूप गर्दी असते. सुभाष मैदानं समोर संध्याकाळी वडापाव, भजी ची गाडी लगते. गाडीभोवती एवढी गर्दी असते की कधीकधी गाडी पण नाही दिसत. गाडीच नाव पण बरोबर शोभत तिला " फ़ेमस वडापाव".

सकाळी नाश्ता करायचा तो ही  मित्रांबरोबर तर मिसळ पाव शिवाय पर्याय नाही. टिळक चौकात सुरभी म्हणून छोट हॉटेल आहे. तिथे मिसळ पाव, वडा  पाव, पोहे वगैरे पदार्थ मिळतात. पण मजा येते ती मिसळ खायला. पुणेरी तिखट मिसळ. ही मिसळ प्रसिद्ध आहे ती जन्याची मिसळ म्हणून. तिखट मागितली की धूर निघालाच म्हणून समजा …. गांधी चौकात हरी विठ्ठला ची मिसळ पण तशीच प्रसिद्ध आहे. ह्या दोघां व्यतिरिक्त आणखी एक मिसळ प्रसिद्ध आहे  ती म्हणजे लोकमान्य हॉटेल मधली.

पारनाक्या जवळ अखिलेश पाणीपुरी वाल्याकडे नेहमी गर्दी मिळेल. त्याच्याकडे पाणीपुरी खायची आणि नंतर समोर कावरे आईस क्रीम खायचं. व्वा … समोसा खावा तर ठक्कर चा. टिळक चौकात ठक्कर फरसाण वाल्याच दुकान आहे. त्याच्याकडे फक्त सकाळीच सामोसा मिळतो. पहिल्या फटक्यात तुमचा नंबर लागला तर नशिब. नाहीतर वाट बघण आलच. त्याच्याकडची चटणी तर अप्रतिम.

संध्याकाळी लाल चौकीला जाताना तेलवणे हॉस्पिटल जवळ एका गाडीवर खूप गर्दी दिसते आणि येणाऱ्या  सुगंधामुळे राहवत नाही. ती गाडी म्हणजे पवार मुगभजी. एकदा खाऊन बघा बाकी सगळ विसराल. त्याशिवाय रामबागेत गेलात तर अंबर चा वडापाव पण प्रसिद्ध. त्याच्या वड्याला खरी चव येते ती त्याच्याकडच्या  चटणीमुळे.

बघा आणखी काय आठवत का आणि सांगा तुमच्याकडे काय काय प्रसिद्ध आहे ते ….