बुधवारी दुपारी नॉन-वेज खायचा बेत आदल्या दिवशीच ठरला होता. त्याप्रमाणे आम्ही सगळे निघालो. मसजिद स्टेशन जवळ कर्नाक बंदराजवळ आहे होटेल मांडवी. एकदम लहान होटेल आहे. उत्कृष्ट नॉन-वेज मिळत. सर्व प्रकारचे मासे - बोम्बिल, सुरमय, कोलंबि, शिम्पले - काय मागाल ते.
आम्ही ६ जणांनी मिळून ४ सुरमय फ्राय, २ मांदेली फ्राय, १ बोम्बिल फ्रायवर हल्ला केला. बरोबर पोळ्या, भात आणि माशाचा रस्सा. जेऊन झाल्यावर सोलकढी. वा ! झक्कास बेत झाला.
बघा फोटो बघुनच कसं तोंडाला पाणी सुटतं ते . . .
सुरमय फ्राय
बोम्बिल फ्राय
मांदेली फ्राय
आणि
सोलकढी