Monday, March 22, 2010

शेव भाजी

शनिवारी संध्याकाळी  मी आणि मयुरेश निलेशकड़े गेलो. IPL बघत होतो. बोलता बोलता विषय निघाला शेव भाजीचा. निलेशने सांगीतले त्या ढाब्यावर (नाव आठवत नाही)  शेवभाजी चांगली मिळते. मग काय लगेच ठरले आजचे रात्रीचे जेवण "शेवभाजी".

निलेश कड़े जायच्याआधीच आईने विचारले होते " रात्री जेवायला येणार ना घरी ?" आणि मी हो म्हटले होते. झालं ... मनात म्हटलं आता फ़ोन केल्यावर काही खरं नाही. फ़ोन केला आणि सांगीतले घरी जेवायला येणार नाही. नशीब माझं आई काही बोलली नाही. उलट म्हणाली " मला एक्सपेक्टेडच होतं " .

चला मग स्वारी निघाली. २ bikes आणि त्यावर मी, मयुरेश, निलेश आणि संदीप दादा. कल्याणहून ठाण्याला जाताना bypass cross करायचा आणि ठाणे साइडला जायचे. मानकोली नाक्याआधी एक पेट्रोल पम्प लागतो. त्याच्या मागेच आहे हा ढाबा.

आधी २ शेवभाजी, १ मटन मसाला  आणि ४ भाकरी मागवली. आणि शेवभाजीची स्तुती करत जेवण सुरु झाले. बोलता बोलता निलेशच्या मित्राचा विषय निघाला. निलेशच्या मित्राने सांगीतले की त्याला चिकन खायची खूप इच्छा झाली म्हणून त्याने होटेल मधे जाऊन चिकन आणि भाकरी हाणली. तर त्याच्या भावाने त्याला वेड्यात काढले का तर चिकन खायचे होते तर भाकरी का खाल्ली ? तो म्हणाला " चिकन खायचे होते तर फक्त चिकन खायचे ना ! ". मग काय आम्ही पण फक्त शेवभाजी तर खायला गेलो होतो आणि भाकरी पण खात होतो. म्हणून नंतर फक्त शेवभाजी मागवली २ प्लेट. आणि शेवभाजिवर हात मारला. खरच खूप उत्कृष्ट होती शेवभाजी.

पुन्हा असा बेत करायला काहीच हरकत नाही. काय म्हणता!!!

Monday, March 15, 2010

दुपारचे जेवण ... श्री गजानन होटेल.

दुपारचे जेवण ... श्री गजानन होटेल.

दि. ११ मार्च २०१० - आमचे ठरले उद्या दुपारचे जेवण बाहेर होटेलमधे करायचे . कोणीही Tiffin आणायचा नाही. Canteen मधेतर नक्कीच जेवायच नाही. मग कुठे जायचं तर योगेश बोलला ' होटेल गजानन ' . तर मग ठरलं .योगेशकडून होटेलची स्तुती ऐकली होती म्हणून उत्सुकता आणखी ताणली होती.

 दि. १२ मार्च २०१० - सगळे निघालो दुपारी. साधारण पाउण वाजता निघालो. होटेल मसजिद पश्चिमेला होते. आणि ऑफिस पूर्वेला. मसजिदला दादर साईडचा रेल्वे bridge ओलांडला की दादर साईडला रेल्वे track च्या बाजूने थोड़े चालायचे की येतेच होटेल गजानन. खूप गर्दी होती पण बाहेरून वाटणार पण नाही की इथे एक झक्कास होटेल आहे.

मेन्यु कार्ड बघायची गरजच लागली नाही. कारण या होटेल चा अनुभव असलेले  काही मित्र होते बरोबर. मग काय ऑर्डर द्यायचा मान त्यांचाच ! ऑर्डर दिली - करेला (कार्ल) फ्राय, वांगी फ्राय, चवळी मसाला, सोयाबीन मटर मसाला, पुदिन्याची चटणी, दही, चपाती, डाळ - भात  आणि ताक !!! त्या बरोबर कांदा - लिम्बू - मिरची Complementary !!!




सगळ्यात आधी ताक मागवले. एकदम भगत ताराचंद स्टाइल ने BEER च्या bottle मधे ताक.  वा!!! एकदम झक्कास !!! गरमागरम चपाती, उत्तम चवीच्या भाज्या, पुदिन्याची चटणी - सुरेख बेत. आणि ६ जणांचे बिल किती तर फ़क्त रु. ३५० /-.
आमचे जेवण होई पर्यंत आणखी १५-२० लोक वेटिंग मधे होते. आता एवढ सुरेख जेवण झाल्यावर ताणून झोप हवी होती. पण ते काही शक्य नव्हत. ऑफिसमधे काम करायच होत. पण पुन्हा नक्की असा बेत झालाच पाहिजे हे मात्र ठरलं.
अशी कितीतरी ठिकाण असतील की जी आपल्याला माहिती नसतात. पण उत्तम मेजवानी मिळते तिथे. बघू आणखी नवीन कोणते ठिकाण मिळते का पुढे . . . . .