Wednesday, January 12, 2011

मैसूर भटकंती ...

मैसूर भटकंती ...
बंगलोर ला आल्यापासून बरेच दिवस चालू होते मैसूर ला जाऊ. पण जमतच नव्हते. एक दिवस ठरवल आणि गेलो. दिवस ४ डिसेम्बर २०१०.
फिरायला जायच तर DIGICAM हवा. मलाही घ्यायचाच होता, बरेच दिवस चालू होते. बजेट ठरवल ८०००/-. पण हवा तसा नव्हता मिळत त्या बजेटमधे. मग काय वाढवल बजेट आणि घेतला १४७००/- ला SONY DSC H-५५.
सकाळी ६.३० ला निघालो. ३ ते ४ तास लागतात बंगलोरपासून.  नाश्ता करायला थांबलो. एक जण उपमा खात होता. वाटल चला दोन महिन्यानंतर उपमा खायला मिळेल. पण समजल तो उपमा नव्हता lemon rice होता. सकाळी ८ वाजता कोण भात खाणार? म्हणून इडली खावुन पोट भरल.

सुरुवात केली देवदर्शनाने. श्रीरंगापत्तम ला  रंगनाथस्वामी  मंदिर पाहीले. इथे विष्णुची झोपलेल्या स्थितितिल मूर्ति आहे.





नंतर टीपू सुलतानचा महाल पाहिला. तिथून पुढे मैसूर प्राणीसंग्रहालय (ZOO) :)
मैसुरे ला जाताना एक बोर्ड वाचला  - TO OOTY . वाटले चला OOTY ला पण जाऊ. पण भावनांवर ताबा ठेवला. म्हटले नंतर जाऊ कधीतरी.
मैसूर ZOO मधील प्राणी खरच चांगल्या स्थितीत आहेत.



साहेब मस्त झोपले होते


काय बघताय राव... बहुतेक विचार करत असावेत - कोण प्राणी आले आहेत हे ? :)




साहेबांना बाहेर यायचे होते बहुतेक...


प्लास्टिकच्या होत्या बहुतेक....स्तब्ध पडून होत्या...

मैसूर प्राणीसंग्रहालय (ZOO) पाहून स्वारी निघाली मैसूर palace पहायला. काय म्हणावे त्याबद्दल .... अप्रतिम..... Palace मधे फोटो काढून नाही देत पण आवारात काढता येतात.




मैसूर Palace नंतर पुढचा स्टॉप चामुंडी मंदिर. मंदिर डोंगरावर आहे.


 दर्शन घेतले आणि पुढे निघालो. मैसुरच्या चर्चला धावती भेट दिली.


शेवटचा स्टॉप होता "वृन्दावन गार्डन". आपण सर्वानी movies मधे पाहिले आहे. तीच अपेक्षा घेउन गेलो पण ... ती मजा नाही आता तिथे. अपेक्षाभंग झाला.




वृन्दावन गार्डेन बघून परत प्रवास सुरु केला बंगलोर कड़े. एका ठिकाणी ढाब्यावर chicken tanduri वर ताव मारला. आणि मैसूर च्या आठवनी मनात आणि camera मधे साठवून परत आलो.

3 comments:

  1. खर आहे. म्हैसूरला फक्त प्राणी-संग्रहालय बघण्यासारखे आहे. फोटो छान आले आहेत. वृंदावन गार्डन पूर्ण अपेक्षाभंग करते.
    श्रीरंगपट्टम् जवळ रंगनतित्तु नावाच्या गावात पक्षीअभयारण्य आहे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये निरनिराळे पक्षी येतात. पहा जमलं तर. छान फोटो मिळतील. बाकी हे लोकं कधीही भात खातात. बटाटावडा सदृश्य बोंडा म्हणून एक प्रकार मिळतो. सावध रहा. ;-)

    ReplyDelete
  2. chan! Bangalore is nice...many places to visit. Keep it up!
    'Bonda- soup' is good actually...comon, its not that bad ;)

    ReplyDelete
  3. धन्यवाद ! वृंदावन गार्डन खरच पूर्ण अपेक्षाभंग करते. बोंडा एकदा खाल्ला इकडे. मसाला डोस्याची भाजी घालतात त्याच्यात. खरच सावध रहाण्याजोगा आहे तो प्रकार :)
    त्या पक्षी अभयारण्याला प्रयत्न करीन भेट द्यायची.

    ReplyDelete