Monday, March 22, 2010

शेव भाजी

शनिवारी संध्याकाळी  मी आणि मयुरेश निलेशकड़े गेलो. IPL बघत होतो. बोलता बोलता विषय निघाला शेव भाजीचा. निलेशने सांगीतले त्या ढाब्यावर (नाव आठवत नाही)  शेवभाजी चांगली मिळते. मग काय लगेच ठरले आजचे रात्रीचे जेवण "शेवभाजी".

निलेश कड़े जायच्याआधीच आईने विचारले होते " रात्री जेवायला येणार ना घरी ?" आणि मी हो म्हटले होते. झालं ... मनात म्हटलं आता फ़ोन केल्यावर काही खरं नाही. फ़ोन केला आणि सांगीतले घरी जेवायला येणार नाही. नशीब माझं आई काही बोलली नाही. उलट म्हणाली " मला एक्सपेक्टेडच होतं " .

चला मग स्वारी निघाली. २ bikes आणि त्यावर मी, मयुरेश, निलेश आणि संदीप दादा. कल्याणहून ठाण्याला जाताना bypass cross करायचा आणि ठाणे साइडला जायचे. मानकोली नाक्याआधी एक पेट्रोल पम्प लागतो. त्याच्या मागेच आहे हा ढाबा.

आधी २ शेवभाजी, १ मटन मसाला  आणि ४ भाकरी मागवली. आणि शेवभाजीची स्तुती करत जेवण सुरु झाले. बोलता बोलता निलेशच्या मित्राचा विषय निघाला. निलेशच्या मित्राने सांगीतले की त्याला चिकन खायची खूप इच्छा झाली म्हणून त्याने होटेल मधे जाऊन चिकन आणि भाकरी हाणली. तर त्याच्या भावाने त्याला वेड्यात काढले का तर चिकन खायचे होते तर भाकरी का खाल्ली ? तो म्हणाला " चिकन खायचे होते तर फक्त चिकन खायचे ना ! ". मग काय आम्ही पण फक्त शेवभाजी तर खायला गेलो होतो आणि भाकरी पण खात होतो. म्हणून नंतर फक्त शेवभाजी मागवली २ प्लेट. आणि शेवभाजिवर हात मारला. खरच खूप उत्कृष्ट होती शेवभाजी.

पुन्हा असा बेत करायला काहीच हरकत नाही. काय म्हणता!!!

1 comment:

  1. तेवढ ढाब्याच नाव आणि पत्ता मित्राला विचारून घ्या ना.
    आम्हीं पण करू बेत मग.
    (बाकी खादाडी ची पोस्ट टाकायची म्हंटल्यावर नाव आणि पत्ता हवाच)
    (पत्ता तेवढा टाका लवकर)

    ReplyDelete