Monday, March 15, 2010

दुपारचे जेवण ... श्री गजानन होटेल.

दुपारचे जेवण ... श्री गजानन होटेल.

दि. ११ मार्च २०१० - आमचे ठरले उद्या दुपारचे जेवण बाहेर होटेलमधे करायचे . कोणीही Tiffin आणायचा नाही. Canteen मधेतर नक्कीच जेवायच नाही. मग कुठे जायचं तर योगेश बोलला ' होटेल गजानन ' . तर मग ठरलं .योगेशकडून होटेलची स्तुती ऐकली होती म्हणून उत्सुकता आणखी ताणली होती.

 दि. १२ मार्च २०१० - सगळे निघालो दुपारी. साधारण पाउण वाजता निघालो. होटेल मसजिद पश्चिमेला होते. आणि ऑफिस पूर्वेला. मसजिदला दादर साईडचा रेल्वे bridge ओलांडला की दादर साईडला रेल्वे track च्या बाजूने थोड़े चालायचे की येतेच होटेल गजानन. खूप गर्दी होती पण बाहेरून वाटणार पण नाही की इथे एक झक्कास होटेल आहे.

मेन्यु कार्ड बघायची गरजच लागली नाही. कारण या होटेल चा अनुभव असलेले  काही मित्र होते बरोबर. मग काय ऑर्डर द्यायचा मान त्यांचाच ! ऑर्डर दिली - करेला (कार्ल) फ्राय, वांगी फ्राय, चवळी मसाला, सोयाबीन मटर मसाला, पुदिन्याची चटणी, दही, चपाती, डाळ - भात  आणि ताक !!! त्या बरोबर कांदा - लिम्बू - मिरची Complementary !!!




सगळ्यात आधी ताक मागवले. एकदम भगत ताराचंद स्टाइल ने BEER च्या bottle मधे ताक.  वा!!! एकदम झक्कास !!! गरमागरम चपाती, उत्तम चवीच्या भाज्या, पुदिन्याची चटणी - सुरेख बेत. आणि ६ जणांचे बिल किती तर फ़क्त रु. ३५० /-.
आमचे जेवण होई पर्यंत आणखी १५-२० लोक वेटिंग मधे होते. आता एवढ सुरेख जेवण झाल्यावर ताणून झोप हवी होती. पण ते काही शक्य नव्हत. ऑफिसमधे काम करायच होत. पण पुन्हा नक्की असा बेत झालाच पाहिजे हे मात्र ठरलं.
अशी कितीतरी ठिकाण असतील की जी आपल्याला माहिती नसतात. पण उत्तम मेजवानी मिळते तिथे. बघू आणखी नवीन कोणते ठिकाण मिळते का पुढे . . . . .

2 comments:

  1. वा चांगला बेत झाला की!!! कारलं फ्राय......क्या बात है. . .भूक लागली रे !!!

    ReplyDelete
  2. आत्ता जस्ट तुझी पोस्ट वाचली आणि इतिक्यात तुझी कमेंट आली. भागात ताराचंदला जायचा प्लान आहे लवकरच!!!

    आणि हो फोर्टला कधी गेलास तर तिकडे हुतात्मा चौकच्या ज़रा पुढे एका होटेल मध्ये बनाना आणि कलिंगड डोसा मिळतो. ट्राय कर नकी!!!

    ReplyDelete